राष्ट्रीय विचार, शास्त्रीय विचार

  • अख्ख्या जगाला माहित आहे भारताचा नववर्ष दिन १ चैत्र (म्हणजेच २२ मार्च) . या दिवशी सर्व जगात कुठेही १२ तासाचा दिवस व १२ तासाची रात्र असते.
  • १ चैत्र या दिवशी भारत देशात, आशिया खंडात, उत्तर गोलार्धात वसंत ऋतु सुरू होतो सर्व सृष्टी नव्या मोहोराने टवटवीत होते.
  • भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर मध्ये, एका वर्षात ३६५ दिवस म्हणजेच १२ महिने आहेत. (रोज रात्री १२ वाजता दिवस बदलतो) चैत्र - ३० दिवसाचा, वैशाख, ज्येष्ठ,आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पाच महिने ३१ दिवसांचे, आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन प्रत्येकी ३० दिवसांचे.
  • भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर निसर्गाला अनुसरून आहे, उन्हाळा १८५ दिवस, हिवाळा १८० दिवस. चैत्र - ३० दिवसाचा वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण भाद्रपद हे पाच महिने ३१ दिवसाचे. आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन प्रत्येकी ३० दिवसाचे.
  • १९५७ साली भारताने तीन गोष्टी केल्या
    1. नवे चलन आणले - १ रुपया १०० पैसे केले त्याआधी पै, पैसे, आणे होते. विक्टोरियाची मोहर त्या ऐवजी तीन सिंहाचे चित्र टाकले.
    2. दशमान पद्धतीची वजनमापे आणली. मीटर, लीटर, किलो, हेक्टर हे मापे आणली शेर, औंस, पौंड, मण, बार, फुट, एकर मापे रद्द केली.
    3. नवे कॅलेंडर आणले- २२ मार्च म्हणजेच १ चैत्रला सुरू होणारे जानेवारी ते डिसेंबर महिने असणारे ग्रेगोरियन - कॅलेंडर ऐवजी भारतीय सौर कॅलेंडर आणले.
    आपण भारतीय माणसांनी, नवे चलन स्वीकारले, नवी वजन मापे स्वीकारली, नवे कॅलेंडर?(माहितच नाही)
  • भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर कोणी रचले? डॉ. मेघनाद साहा समितीने रचले आहे. डॉ. साहा यांच्यासह इतर तज्ज्ञ होते.
    1. प्रा. अ. च. बॅनर्जी
    2. प्रा. र. वि. वैद्य
    3. पं. के. ल. दप्तरी
    4. डॉ. अकबर अली
    5. श्री. ज. स. करंदीकर
    6. श्री. निर्मलचंद्र लाहिरी
    7. पं. गोरख प्रसाद
    भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पंचांगे आहेत. जगात अनेक देशांमध्ये स्वतःची वेगळी कॅलेंडर आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करून भारतीय सौर कॅलेंडर (Indian Solar Calender)ची रचना करण्यात आली आहे.
  • आपण आपल्या देशाचे कॅलेंडर कुठे वापरू या!
    1. आपल्या चेकवर भारतीय सौर दिनांक लिहा.
    2. २२ मार्च म्हणजेच १ चैत्र या दिवशी सर्वांना नववर्षाभिनंदन करा.
    3. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री इ. सर्व लोकप्रतिनिधींनी आकाशवाणी, दूरदर्शनवरुन भारतीय जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात, असा आग्रह करणारे पत्र पाठवा.
    4. भारतीय नववर्ष दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा.
    5. दर महिन्याचे पगार १ तारखेला द्या. १ जानेवारी, फेब्रुवारी नव्हे तर १ चैत्र, १ वैशाख इ.
    6. भारतीय रिझर्व बँक (Master circular DBOD No. Leg BC 21/09-07-006) माध्यमिक शाळा संहिता (GAC-1083/89/SE-2 Dt-16-3-83) यांचे परिपत्रके अमलात आणा.
    7. आपल्या घरात, ऑफिसात, टेबलवर, खिशात भारतीय सौर दिनदर्शिका ठेवा. रोजच्या व्यवहारात भारतीय सौर दिनांकचा वापर करा.
  • भारतीय सौर दिनांक आणि इंग्रजी महिने यांचा थेट संबंध आहे
    1. मकरसंक्रात १४ जानेवारी २४ पौष
    2. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी ६ माघ
    3. आंबेडकर जयंती १४ एप्रिल २४ चैत्र
    4. महाराष्ट्र दिन १ मे ११ वैशाख
    5. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २४ श्रावण
    6. गांधी जयंती २ ऑक्टोबर १० आश्विन
    या दिवशी येणारच!
  • भारत सरकारने दिनांक २२ मार्च १९५७ रोजी राष्ट्रीय कॅलेंडर अधिकृतपणे सुरू केले तो दिवस होता १ चैत्र १८७९. भारतीय सौर दिनांक आपल्याला रोज सांगितला जातो-
    1. आकाशवाणीवरून
    2. दूरदर्शनवरून
    3. दैनिकांमधून
    4. शासकीय कॅलेंडरमधून
    5. शासकीय पत्रकांमधून
    6. डायऱ्यांमधून
  • भारतीय कॅलेंडरचा वापर
    1. गॅझेट ऑफ इंडिया
    2. भारत सरकार
    3. रेडीओ सेवा
    4. वर्तमान पत्र
    5. दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये
    6. आंतरराष्ट्रीय करार करताना
    7. सागरी सफरी साठी
  • राष्ट्रीय मानके
    1. राष्ट्रीय प्राणी - वाघ
    2. राष्ट्रीय पक्षी मोर
    3. राष्ट्रीय झेंडा - तिरंगा
    4. राष्ट्रीय खेळ- हॉकी
    5. राष्ट्रीय फूल - कमळ
    6. राष्ट्रीय कॅलेंडर - सौर कॅलेंडर,
    7. राष्ट्रीय सण-१५ ऑगस्ट, २६, जाने-
    8. राष्ट्र गीत - जन-गण-मन
    9. राष्ट्र गान- वंदे मातरम्
    10. राष्ट्रीय वृक्ष- वड
    11. राष्ट्रीय जलचर डॉल्फीन
    12. राष्ट्रीय फळ आंबा
    13. राष्ट्रीय नदी गंगा